Sunday, June 10, 2018

गुलजारांची देवडी (ड्योढी )

किताबोंसे कभी गुजरे तो यू किर्दार मिलते है
गये वक्तोंकी ड्योढी मे खडे कुछ यार मिलते है |

गुलजार म्हणतात त्याप्रमाणेत्यांचे सगळे कीरदार कधी आपल्यात सामावून जातात कळत नाही ... एक एक किरदार ईतक साध त्यांची गोष्ट तीच तुमची आमची अस वाटत असत ... पण गोष्ट संपता संपता कळत ते त्याच वेगळेपण... प्रत्याकाचा असलेला तो मउ हळवा कोपरा प्रत्येक किरदाराप्रमाणे बेगळा ...पण ... अरे अस तर आपल्यालाही वाटत ना  असा विचार करायला लावणारा..

ते किरदार माणूस असेल किंवा आणि दुसरा कुठला जिव ... भावनेची नाळ एकच .... ति गुलजार जाणतात ... ते लिहीत जातात आणि आपण त्या मोहजालात सापडतो .... प्रत्येक किरदार वाचता वाचता जगतो , त्यांच्या बरोबर हसतो आणि प्रसंगी डोळे ही टिपतो ... गुलजारांची देवडी अशीच गजबजलेली राहो .. त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सुध्दा.